Breaking News

आ. कर्डीलेंच्या मध्यस्थीने शेतकर्‍याचे उपोषण मागे


मल्हारवाडी येथील शेतकरी अर्जुन काशिनाथ जाधव कांदाचोरी प्रकरणी हे कुटूंब व मल्हारवाडी ग्रामस्थांसह राहुरी पोलिस ठाण्यासमोर दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. आमरण उपोषणास बसले होते. आज दुसर्‍या दिवशी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आ. शिवाजी कर्डीले यांच्या शिष्टाईने अखेर उपोषण मागे घेण्यात आले.
शाम गाडे याने साधारण 450 गोणी कांदा अंदाजे रक्कम साडेचार लाख रूपये, ट्रकसह धाकदडपशाही करुन लांबविला असल्याने पोलिस तपास सुरु होता, मात्र झालेले आर्थिक नुकसानीमुळे जाधव हे कुटुंब, ग्रामस्थ, नातेवाईकांसह आमरण उपोषणास बसले. याठिकाणी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, जि.प. सदस्य शिवाजी गाडे यांनी भेट देवून पोलिस प्रशासन यांना जाब विचारुन कारवाई करण्याचे संकेत दिले होते. सायकाळपर्यंत उपोषणकर्ते भुमिकेवर ठाम राहील्याने उपोषण सुरुच राहीले होते. अखेर दुपारनंतर आ. शिवाजी कर्डिले हे राहुरी पोलिस ठाण्यासमोर उपोषणस्थळी दाखल झाले. संपूर्ण वस्तुस्थिती लक्षात घेत प्रशासनासह माहीती जाणून घेत तोडगा काढत यशस्वी बोलणी सुरु ठेवली. दोनतासाच्या प्रदीर्घ चर्चेअंती यशस्वी शिष्ठाई करुन तहसिलदार अनिल दौंडे व पो.नि. प्रमोद वाघ यांचेशी संवाद साधून उपोषणकर्ते महसूल व पोलिस प्रशासन यांच्यात समन्वयाची भुमिका बजावून कडक कारवाई करण्याचा आदेश बजावला. आ. कर्डीले यांनी यावेळी भुमिका स्पष्ट करताना सांगितले की, येत्या दोन दिवसात आरोपिंना अटक करुन चोरीस गेलेला मुद्देमाल ( कांदा ) हजर करुन जाधव यांना न्याय द्यावा अन्यथा 2 दिवसानंतर अन्य लोकशाही मार्गाचा अवलंब करुन आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. याप्रसंगी सर्वपक्षिय नेते हजर होते. यात शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तनपुरे कारखान्याचे जेष्ठ संचालक नामदेव ढोकणे, राहुरीचे माजी उपनगराध्यक्ष आर.आर. तनपुरे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष पंडुतात्या पवार, तालुका दुध संघाचे तान्हाजी धसाळ, ज्येष्ठ मार्गदर्शक जगन्नाथ गाडे, शिवाजी सागर आदी उपस्थित होते. अर्जुन जाधव यांना आ. कर्डीले यांचे हस्ते पाणी देण्यात येवून उपोषण स्थगित झाले.