नाफेडच्या तूर खरेदी केंद्राला पारनेरमध्ये सुरुवात
सभापती प्रशांत गायकवाड यांनी तूर खरेदी योजनेचे निकष व अंमलबजावणीबाबत माहिती दिली. शासकीय तूर खरेदीबाबत मार्गदर्शन केले. शेतकर्यांनी आपल्या शेतीमालाची विक्री बाजार समितीमार्फतच केली पाहिजे. त्यांच्या नावे शेती आहे त्यांचेच नावाने शेतीमालाची विक्री करावी. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ संबंधी शेतकऱ्यास मिळण्यास मदत होईल असे म्हणाले.
शासकीय तूर खरेदी योजनेसाठी सब एजंट बनून बाजार समितीची नियुक्ती करण्यात आली असून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळावा. म्हणून आधारभूत किंमत रुपये ५,०००/- दराने तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. मोठ्या उत्पन्नामुळे तुरीचे भाव कोसळल्यास साधारण३,६००/- ते ४०००/- दराने तुरीची व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात येत असून त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. बाजार समितीच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी यंत्रणा वाढवून स्वच्छ काडीकचरा विरहित आणण्याचे आव्हान करण्यात आले आहे. बारा टक्के आद्रता असणारी तूर केंद्रावर विकली जाणार आहे. पिकाची नोंद असलेला सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुकची, झेरॉक्स देऊन नोंदणी करणे देणार आहे. शेतमाल बाजार समितीने स्विकारल्या नंतर सात दिवसांत ४,०५०/- रुपये प्रतिक्विंटल दराने होणारी रक्कम ऑनलाइन शेतकर्यांच्या बँक खाती जमा केली जाणार आहे.
