जवळा गावात महिला सशक्तीकरण
आय सी.आय.सी.आय. फाऊंडेशनच्या वतीने जामखेड तालुक्यातील जवळा व नान्नज गावाची डिजिटल व्हिलेजसाठी निवड करण्यात आली. डिजिटल व्हिलेज अंतर्गत जवळा नान्नज गावामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. आय सी आय सी फाऊंडेशनच्या वतीने जवळा नान्नज गावातील 80 गरजू महिलांना मोफत शिवण क्लासचे एक महिणा प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणांतर्गत महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्या प्रशिक्षणचा निरोप समारोप उत्साहात पार पडला. यावेळी प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी आपण शिवलेल्या ड्रेसेसचे प्रदर्शन भरवले होते.
या वेळी जवळा गावच्या सरपंच साधना पवार, ज्योती क्रांती मल्टिस्टेटचे अध्यक्ष अजिनाथ हजारे, युवा नेते शरद हजारे, दयानंद कथले, पोपट शिंदे, ईश्वर हजारे, जवळा विकास समूहाचे संदेश हजारे, अशोक पठाडे, सावता हजारे, मुकुंद रोडे, किरण हजारे, प्रफुल्ल कोकाटे उपस्थित होते. यावेळी आईसीआईसी फोंडेशनचे गणेश भोरे, बँक मॅनेजर महेश वारे, अरविंद भालेराव उपस्थित होते. यावेळी उज्वला रोडे, छाया देवामाने, वैशाली कोल्हे, सरिता कथले, रेखा खेतकर, शुभांगी वाघमारे, रेणुका शिंदे, आयेशा शेख, अश्विनी हजारे, ज्योती खेतकर, शिल्पा कथले आदी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना शरद हजारे म्हणाले की, गावातील महिला प्रथमच एकत्र आल्या आहेत, त्यांना व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतचे गाळे उपलब्ध करुन दिले जातील तसेच आपण मशीनचे प्रस्ताव सादर केल्यास आपणास पाठपुरावा करून मशीन उपलब्ध करुन देऊ असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन उज्वला रोडे यांनी, तर आभार शिल्पा कथले यांनी मानले.
