महाशिवरात्रीला झाली माठांची विक्रमी खरेदी
उन्हाळ्याची चाहूल नुकतीच लागली आहे. या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे माठ पैठणच्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत. विविध आकारांतील व रुपातील मातीचे माठ नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या माठासह रांजणही पैठण शहर व परिसरात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. या माठांना ग्राहकांमधून चांगली मागणी आहे. हल्ली घरोघरी फ्रीज दिसू लागले असले तरी माठातील थंडगार पाण्याला नागरिकांची अधिक पसंती आहे. एप्रिल आणि मे हे उन्हाळ्याचे दोन महिने कडक जाणार आहेत. त्यामुळे मातीचे माठ विक्री करणार्या व्यावसायिकांची येथे मोठी लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, ‘गरिबांचे फ्रीज’ म्हणून ओळखले जाणारे हे महाशिवरात्रीचे औचित्य साधून अनेकांनी हे माठ खरेदी केले.
