Breaking News

शिक्षकाकडून दुसर्‍या शिक्षकाची हत्या


मुंबई : एका शिक्षकाने दुसर्‍या शिक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मालाडमधील मालवणी परिसरातील अबुजवाडीमध्ये ही घटना घडली आहे. अरुप बिश्‍वास असे हत्या करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. विजय या शिक्षकाचा खासगी क्लास आहे. आपल्या ट्युशन क्लासमधील मुले दुसर्‍या ट्युशन क्लासमध्ये शिक ायला गेल्याच्या रागातून विजय याने अरुप यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अरुप यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.