Breaking News

चिमुकल्यांच्या कलागुणांनी पालकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले ट्युलीप्स स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात


कोपरगाव ता. प्रतिनिधी :- ‘रविवार माझा आवडीचा’, ‘लाल टमाटर’, ‘ये है मेरी जिंदगी’, ‘फुलोंका तारोंका सबका कहना है’ अशा एकापेक्षा सरस गीतांवर चिमुकल्यांनी केलेल्या बहारदार नृत्यांनी उपस्थित पालकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. पाल्यांचा हा कौतुक सोहळा आणि कलागुण पाहण्यासाठी आतुरलेल्या पालकांना चिमुरड्याने केलेली धमाल खूपच सुखावून गेली. येथील ट्युलीप्स स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाला शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी दाखवलेले धाडसी प्रात्यक्षिकाने उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकवला. विविध पथकाच्या रंगलेल्या डावाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या ‘मुझे मत काटो, मुझे दर्द होता है!’ या नाटिकेने वृक्षरोपण व संवर्धनाचा अनमोल संदेश दिला गेला. यावेळी संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, संजीवानी अकॅडमीच्या विश्वस्त मनाली कोल्हे, सुमीत कोल्हे, माजी नगराध्यक्षा, विद्यमान नगरसेविका ऐश्वर्या सातभाई, माजी नगराध्यक्ष पदमाकांत कुदळे, नामदेवराव परजणे दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरसेवक डॉ. अजय गर्जे, दिनार कुदळे, विरेन बोरावके, प्रसाद नाईक, मनसेचे उपजिल्हा प्रमुख संतोष गंगवाल आदी उपस्थित होते. प्रारंभी ट्युलीप्स स्कूलच्या संस्थापिका आणि संचालिका स्मिता कुदळे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन उपासना पटेल यांनी केले.