Breaking News

अर्थमंत्री अरूण जेटलींची अग्निपरीक्षा,सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करण्याचं आव्हान


अर्थमंत्री अरूण जेटलींची आज अग्निपरीक्षा आहे. सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करण्याचं आव्हान अरूण जेटलींसमोर असणार आहे. जीएसटी कायदा लागू झाल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. एकूणच जीएसटी कायद्यामुळं नाराज झालेल्या उद्योगांना आणि व्यापाऱ्यांना खूश करण्यासाठी अरूण जेटली अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. तसंच करदात्यांना जेटली दिलासा देणार का, महिला, विद्यार्थी आणि शेतकरी वर्गासाठी कोणत्या नवीन घोषणा केल्या जातील याचं सगळ्या देशाचं लक्ष असेल. शिवाय २०१९च्या पहिल्या सहामाहीत लोकसभेच्या निवडणुकादेखील आहेत. त्यामुळे मोदी सरकारचं पूर्ण अर्थसंकल्पाचं हे शेवटचं बजेट.