Breaking News

दोडामार्गवर दोन टस्करांचे संकट

सिंधुदुर्गनगरी, दि. 24, फेब्रुवारी - दोडामार्ग तालुक्यात वीजघर बांबर्डे परिसरात टस्कर हत्तीने आपला मोर्चा सोनावलकडे वळवला. सोलावलमध्ये त्याने माड, केळी, कुळीथ, भातशेतीचे नुकसान केले. तेथील निवास आणि न्याहारीसाठी बांधलेल्या वन हर्ष रेस्ट हाऊस सभोवतालच्या सौरऊर्जा कुंपणाची मोडतोड केली. त्यानंतर धनगरवाडीत धुडगूस सुरु असताना त्याला हाकलण्यासाठी सलेल्या चौडू पाटील यांचा त्याने पाठलाग केला. त्यांचे दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. 


सोनावल परिसरात हिरवीगार भातशेती तरारून आली आहे. अनेक शेतकर्‍यांनी वायंगणी शेती केली आहे. त्या शेतीत हत्तीने धुडगूस घातला. भातशेती तुडवून नुकसान केले. कु ळीथ पिकाचेही नुकसान केले. चंदगड तालुक्यातील नामखोल गावातून सोनावलकडे येणार्‍या मातीच्या रस्त्याने तो आला. पहिल्यांदा दहा साडेदहाच्या दरम्यान तो मॅग्डेलिना इक ोलासो यांच्या खासगी बागेतील वन हर्ष नावाच्या निवास आणि न्याहारीसाठीच्या रेस्ट हाऊस समोरील सौरउर्जा कुंपण उद्ध्वस्त करून बागेत शिरला. तेथे त्याने घड आलेल्या के ळी जमीनदोस्त केल्या. केळीचा गाभा फस्त करून तो पुढे सरकला. यावेळी तो एका वीज खांबाजवळून चिंचोळ्या वाटेने दुसर्‍या केळीच्या बनात शिरला. तेथेही नुकसान केले आणि त्याचे बागेतील माड जमीनदोस्त करून धनगरवाड्यातील वस्तीत शिरला. तेथील लक्ष्मी वरक यांच्या घरामागच्या केली त्याने जमीनदोस्त केल्या. वेळ साधारण पहाटे तीनची होती. कुत्र्यांच्या आवाजाने लक्ष्मी वरक, बाबू बोडेकर, चौडू पाटील घरातून बाहेर आले. सुरुवातीला त्यांना गवारेडा आळा असेल असे वाटले. म्हणून पाटील यांनी दांडा घेऊन आरडाओरडा करत त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, पण पाहतात तर हत्ती. हत्तीनेही झटकन वळत पाटील यांचा पाठलाग केला. पाटील, बोडेकर यांनी पळ क ाढला. हत्ती नामखोलहून आलेला मातीचा रस्ता पार करून बोडेकर यांच्या अंगणात कुंपण पार करून थांबला. अन्यथा अनर्थ घडू शकला असता.