Breaking News

कणकवलीत उद्या रंगणार मास्टर शेफ स्पर्धा


सिंधुदुर्गनगरी, दि. 24, फेब्रुवारी - ग्रामीण आणि शहरी जीवनमानात असलेली खाद्यसंस्कृती जतन केली जावी. पारंपरिक पद्धतीतील खाद्यपदार्थ नाविन्य पुर्णरित्या बनविले जावेत आणि महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा वारसा वृद्धींगत केला जावा यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कणकवलीच्या वतीने कणकवली मास्टर शेफ 2018 या पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आ.नितेश राणे यांच्या संकल्पनेतुन ही स्पर्धा साकारली जात असून विजेत्या महासुगरण स्पर्धकाला सोन्याचा नेकलेस देऊन गौरविले जाणार आहे. तर उप विजेत्या द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकाना सोन्याची कर्णफुले आणि अंगठी दिली जाईल. 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता गणपतीसाना येथे ही स्पर्धा रंगणार आहे.