Breaking News

गावाच्या गरजानुसार विकास कामांना प्राधान्य - गुलाबराव पाटील

जळगाव, दि. 24, फेब्रुवारी - गावाचा सर्वांगीण विकासांचे नियोजन करताना गावाच्या निकडीच्या गरजे नुसार विकास कामांना प्राध्यान्यक्रम दिला जातो, असे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी आज निमगाव येथे केले. त्यांच्या हस्ते आज सकाळी निमगाव-बेळी 1 कि.मी रस्त्याचे भूमीपूजन झाले त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. सदर रस्त्यासाठी आमदार निधीतून 10 लक्ष निधी मंजूर करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य लालचंद पाटील होते.


पाटील पुढे म्हणाले की, निमगाव बेळीदरम्यान दळणवळण चांगले व्हावे यासाठी नाबार्ड मार्फेत नदीवर मोरीचे बांधकाम करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत तसेच या गावात एस टी बस सेवा सुरु करण्यात येईल. गावातील तरुणांना शरीर सौष्ठव तयार करण्यासाठी व्यायामाचे साहित्य करीता रु. 10 हजार रोख देणगीही पाटील यांनी यावेळी दिली.