लक्झरी बस- आइशर मध्ये जोरदार टक्कर; दोन जागीच ठार
याबाबत समजलेली महिती अशी की, मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास नगर कडून येणाऱ्या बसचा आणि बीड कडून जाणाऱ्या आईशर मालवाहतूक करणाऱ्या अवजड गाडीच्या समोरासमोर झालेल्या टक्करीत लक्झरी बस चालक सोपान ढाकणे (रा. परभणी,वय ३२) व आईशर गाडीचा चालक परमेश्वर लोखंडे (रा. रुई गेवराई तालुका,वय ३०) जागीच ठार झाले आहेत. घटनास्थळी पोलीस हवालदार अरविंद चव्हाण, संजय अकोलकर, पोलीस कॉन्स्टेबल नईम पठाण, पोलीस नाईक वाल्मिक पारदी, यांनी धाव घेतली. चालक परमेश्वर लोखंडे हा पेंड घेऊन पुणे येथील मार्केट मध्ये जाण्यासाठी सोमवारी रात्री साडे नऊ वाजता आपल्या घरून निघाला होता. तर लक्झरी बस ही पुण्यावरून परभणी कडे जात होती. ही बस साई कृपा ट्रान्सपोर्ट शिवाजीनगर (पुणे) येथील आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्या चक्काचूर झाल्या होत्या आणि दोन्ही चालकाचा मृतदेह त्यामध्ये गुंतला होता. सुमारे साडेतीन तासाच्या पोलिसांच्या आणि गावकऱ्याचा शर्तींच्या प्रयत्नानंतर जेसीबीच्या साह्याने गाड्या एकमेकापासुन बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी विकास राठोड या युवकाने व माळीबाभुळगाव गावकर्यांनी पोलिसाना सहकार्य केले.