Breaking News

शाळांसाठी गडाख साहेबांनी दिलेली शिकवण जोपासण्याचा प्रयत्न : गडाख.


नेवासा/ शहर प्रतिनिधी/- शाळांसाठी गडाख साहेबांनी दिलेली शिकवण व संस्काराची जोपासना करण्याचा प्रयत्न आहे. असे वक्तव्य सुनीता गडाख यांनी केले. जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नेवासा पंचायत समितीच्या वतीने नेवासा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी स्वच्छ शाळा-स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते नेवासा पंचायत समिती मध्ये स्पर्धेतील विजेत्या शाळांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुनीता गडाख हया अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.उपसभापती राजनंदिनी मंडलिक, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, स्नेहल घाडगे-चव्हाण, रावसाहेब कांगुणे, किशोर जोजार, बाळासाहेब सोनवणे, पार्वती जावळे, सुषमा खरे, कल्पना पंडित, कल्पना बर्डे, वैशाली एडके, सुधाकरराव मुंढे, हेमलता गलांडे हे व्यासपीठावर उपस्थित होते.शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी विलास साठे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.