Breaking News

काठी स्थापना कार्यक्रम संपन्न


पाथर्डी/प्रतिनिधी/- सालाबादप्रमाणे नाथनागर येथील कानिफनाथ सेवा मंडळ व दुधाळ परिवार यांच्या वतीने कानिफनाथ यात्रेच्या महोत्सवानिमित्त रविवार,२५ फेब्रुवारीला काठीची स्थापना करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या हस्ते नारळ फोडून शहरातून कानिफनाथ मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच नगरसेवक प्रसाद आव्हाड, पत्रकार नितीन गटांनी, युवा नेते प्रशांत शेळके, धनंजय थोरात यांनी मिरवणुकीचे स्वागत केले.रविवारी सकाळी आठ वाजता रुद्र अभिषेक,दुपारी भिक्षुक,राहाड कार्यक्रम,सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला.रविवारी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.