नीरव मोदीचे कर्जत कनेक्शन...?
पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळयाचा प्रमुख सूत्रधार निरव मोदी याचे नावाने खंडाळा येथे जमीन असल्याचे समोर आले आहे. अगोदरच कर्जत येथील मनोज खरात या कर्जतच्या युवकाचे या घोटाळ्यात नाव आल्याने चर्चेला उधाण आले असतानाच, या माहितीने पुन्हा कर्जत चर्चेच्या अग्रभागी आले आहे.
कर्जत टाकळी खंडेश्वरी या मार्गावर खंडाळा येथील डोंगराळ भागात पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळयाचा प्रमुख सूत्रधार मोदीच्या नावाने जमीन असल्याचे उघड झाले. मोदी शिवाय अनेक बाहेरील बड्या लोकांच्या जमिनी या ठिकाणी आहेत. याबाबत खंडाळाच्या तलाठी सुजाता गुंजवटे यांनी या माहितीस दुजोरा दिला आहे. येथील डोंगरावर काही वर्षापुर्वी फायरस्टोन प्रा. लिमिटेड कंपनीने सौरउर्जेवरील मोठा प्लांट सुरू केला असुन त्याचे जवळच नीरव मोदीची ही जमींन असल्याचे समजते. येथील जवळजवळ 125 ते 150 एकर जमींन तपासी यंत्रनेच्या रडारवर असुन त्यातील 25 एकर जमींन फक्त मोदीच्या नावावर आहे. तरी इतर जमिनीच्या मालकांचे व नीरव मोदीचे काही संबंध आहेत काय याचा शोध तपासी यंत्रणेस लावावा लागणार आहे. या माहिती बाबत खंडाळा येथे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता कोणीही माहिती द्यायला तयार नव्हते. मात्र नीरव मोदीच्या नावाने खंडाळा ग्राम पंचायत हद्दीत जमींन असल्याच्या माहितीला तलाठी व ग्रामसेवक नवनाथ गायकवाड यांनी दुजोरा दिला असल्याने कर्जत तालुका पुन्हा चर्चेत आला आहे. नीरव मोदी याने 2011 साली कर्जत तालुक्यात ही जमींन खरेदी केली असून यासाठी नीरव मोदी स्वत: आला होता का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.