Breaking News

राज्यात‘स्टार्टअप इको सिस्टीम’ सुरु करणार : मुख्यमंत्री

नागपूर : स्टार्टअप संदर्भात राज्यन धोरण तयार करण्यात आले आहे. नागपूरसह राज्यातील 12 जिल्ह्यात ‘स्टार्टअप इको सिस्टीम’ सुरु होणार असून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी, नागपुरात केली. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित युथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये मार्गदर्शन क रतांना मुख्यमंत्री बोलत होते.


यावेळी फडणवीस म्हणाले की, युवकांना रोजगार आणि उद्योग जगताला कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या पार्श्‍वभूमिवर आयोजित युथ एम्पॉवरमेंट समिट हा स्त्युत्य उपक्रम आहे. उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्यासाठी मॅग्नेटीक महाराष्ट्र कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले.