Breaking News

भिडे, दवे, एकबोटेंच्या अटकेसाठी धरणे आंदोलन


पैठण / प्रतिनिधी :- पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगांव येथील विजयी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या आंबेडकर अनुयायांवर दि.१ जानेवारी रोजी भ्याड हल्ला करून जाळपोळ करण्यात आली होती. याप्रकरणी मिलिंद एकबोटे ,संभाजी भिडे, आनंद दवे महाराष्ट्रभर गुन्हे नोंद दाखल करण्यात आली आहेत. मात्र अद्यापदेखील आरोपी मोकाट आहेत. त्यांना तात्काळ अटक करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पैठणच्या तहसील कार्यालयावर सोमवारी {दि. ५} बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 
या मोर्चादरम्यान, आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. बहुजन समाजातील विविध २२ सामाजिक संघटनांनी बहुजन क्रांती मोर्चाला पाठिंबा दर्शविला. याप्रसंगी बहुजन क्रांती मोर्चा मराठवाडा संयोजक चंद्रकांत इंगोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मोर्चादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी ‘भिमा कोरेगाव’च्या घटनेचा भाषणातून निषेध नोंदविला.