Breaking News

पहिला अर्थसंकल्प होता केवळ १७१ कोटींचा !


अर्थमंत्री अरुण जेटली आज देशाचा ८८ वा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. स्वातंत्र्यानंतरचे ते २५ वे अर्थमंत्री आहेत. १९४७ सालापासून आतापर्यंत सामान्य आणि अंतरिम मिळून एकूण ८७ अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहेत.
देशाचा पहिला अर्थसंकल्प केवळ सात महिन्यांसाठी सादर करण्यात आला होता. तत्कालीन अर्थमंत्री आर. के. शनमुगम शेट्टी यांनी २६ नोव्हेंबर १९४७ रोजी साडेसात महिन्यांसाठी अर्थसंकल्प सादर केला होता. केवळ १७१ कोटींचा हा अर्थसंकल्प १५ ऑगस्ट १९४७ ते ३१ मार्च १९४८ या साडेसात महिन्यांसाठी सादर करण्यात आला होता. 

या अर्थसंकल्पात १७१.८५ कोटी रुपये महसूल जमवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. तसेच महसुली तूट २४.५९ कोटी रुपये ठरविण्यात आली होती. तेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे चलन एकच होते. सप्टेंबर १९४८ पर्यंत भारत व पाकिस्तानचे चलन एकच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.