Breaking News

राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेला शानदार प्रारंभ


कोपरगाव ता. प्रतिनिधी :- येथील गौतम पब्लिक स्कूलची माजी विद्यार्थी संघटना आणि गौतम पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय हॉकी खेळाडू कै. रविंद्र पाटील यांच्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेला आज {दि. ३१} शानदार प्रारंभ झाला आहे. या दोन दिवसीय स्पर्धेचा समारोप आज {दि. १} होणार आहे. 
या स्पर्धेचे उदघाटन गौतम पब्लिक स्कूलचेचे माजी हॉकीपटू तसेच विभागीय पुणे येथील वनअधिकारी बाळासाहेब जगझाप यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे संचालक, कै. रविंद्र पाटील यांचे कुटुंबीय, माजी विद्यार्थी व माजी हॉकीपटू विजय जाधव, बाळासाहेब वक्ते, नाना नवले, अजय कुलकर्णी, विलास खोंड, गोरख जाधव, वाल्मिक भिंगारे, अण्णासाहेब काळे, रामराव साळुंके, श्यामराव जाधव, गौतम पवार, विजय रोहम, चांगदेव आगवन, सीताराम राहणे, विठ्ठल सोनवणे, प्राचार्य नूर शेख आदी उपस्थित होते.

दरम्यान, या हॉकी स्पर्धेचे आणि कै. सुशीलामाई काळे यांच्या पुण्यस्मणार्थ आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण आज {दि. १} दुपारी ३.०० वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे हे राहणार आहेत. धुळे येथील कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिकल डायरेक्टर सुधाकर नीलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, संजय इटकर, रिजवान पठाण, कन्हय्या गंगुले आदी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्तार शेख आणि गोरख चव्हान यांनी केले.