Breaking News

बहुचर्चित बेलापुर- परळी रेल्वेमार्ग न्यायासाठी न्यायालयाच्या कक्षेत ?


कुकाणा :-  96 वर्षापासून जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला गेलेला बहुचर्चित व बहुप्रतीक्षित असलेल्या बेलापुर- नेवासा- शेवगाव- गेवराइ- परळी या रेल्वे मार्गाला प्रलंबित ठेवल्याबाबत औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती एस. एम. गव्हाने यांनी भारतीय संघराज्य सचिव रेल्वे मंत्रालय नवी दिल्ली , मुख्य संचालक (प्रकल्प निधी व्यवस्थापक) रेल्वे बोर्ड, रेल्वे भवन नवी दिल्ली मुख्य प्रशासनिक अधिकारी (बांधकाम) मुंबई , रेल्वे महाप्रबंधक मुंबई , तसेच महाराष्ट्र शासन मुंबई यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्याचे आदेश नुकतेच दिले आहे. 
यासंदर्भातील मिळालेली माहिती अशी की, वरील रेल्वे मार्गासाठी ब्रिटिशांनी जमिनीचे अधिग्रहण करुन जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना दिला. या मार्गावर माती भराव टाकण्यात आला. त्यानंतर हा मार्ग प्रलंबित ठेवण्यात आला. या मार्गाच्या पूर्णत्वासाठी बेलापुर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेने गेल्या 8 ते 10 वर्षापासून पाठपुरावा सुरु केला. परंतु या पाठपुराव्याची दखल घेतली जात नसल्याने सेवा संस्थेने औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. सदर याचिका सेवा संस्था व संस्थेचे सचिव रितेश भंडारी यांचे नावे 109/2017 या क्रमांकाने दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत वरील रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण बेलापुर- नेवासा- शेवगाव- गेवराइ- परळी असे होणे अपेक्षित असताना त्याचे सर्वेक्षण बेलापुर- नेवासा- शेवगाव- पाथर्डी- राजुरी- रायमोह- बीड असा चुकीचा केला. या चुकीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात ही याचिका दाखल केल्याचे सेवा संस्थेने सांगितले आहे. सेवा संस्थेच्या वतीने एडव्होकेट. विनोद पाटिल हे काम बघत आहे. तसेच या याचिकेत एडव्होकेट. हर्षल रणधीर हे सहकार्य करीत आहे. ही याचिका दाखल झाल्याने कुकाना व परिसरातून नागरिकांच्या रेल्वेमार्ग संदर्भात आशा पल्लवित झाल्या आहेत .