Breaking News

वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज:अमर कसबे


नेवासा/ता. प्रतिनिधी/- पर्यावरणाच्या बिघडलेला समतोल, अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव अमर कसबे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील निपानी निमगाव येथील लक्ष्मीमाता मंदिराच्या जिर्णोध्दार व मंदिराचे भुमिपुजन आणि वृक्षरोपण अमर कसबे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. लक्ष्मीमाताच्या जिर्णोध्दाराठी अमर कसबे यांनी ५१ हजार रुपये दिले. या रकमेचा धनादेश त्यांनी व्यवस्थापकांना सुपुर्द करण्यात आला.

कसबे पुढे म्हणाले की , वृक्षारोपण ही गरज व त्याचे महत्त्व जवळपास प्रत्येकाला समजून चुकले आहे. भरपूर वृक्ष लावलेल्या बागेत नियमित फिरल्याने, व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच शरीरावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांचा प्रभावही कमी होतो. झाडे जितकी जास्त असतील तितक्या प्रमाणात श्वसनाशी संबंधित रुग्णांची संख्या घटेल, असे संशोधनकर्त्यांनी देखील मत मांडले आहे. त्यामुळे फक्त वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन कसबे यांनी केले.

याप्रसंगी रमेश मोहड, बाळासाहेब आढाव, आवेश चव्हाण, कुंडलिक चिंधे, ज्ञानदेव सकट, अर्जुन कांबळे आदींसह ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थित होते