Breaking News

संत रोहिदास जयंती उत्साहात साजरी!


पाथर्डी/शहर प्रतिनिधी/- पाथर्डी तालुक्यातील दुले चांदगांव येथे संत रोहिदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी प्रवचन व किर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यामुळे नवीन पिढीला संत रोहिदास महाराजांचे कार्य व जीवनाविषयी माहिती झाली.

रोहिदासांचा जन्म, इ.स.१३७६ च्या सुमारास काशीजवळ गोवर्धनपूर येथे झाला. रोहिदासांच्या भक्तीवेडामुळे प्रपंच व व्यवसायाचे नुकसान होऊ लागले. संत रोहिदास प्रामुख्याने वेद, उपनिषधे व दर्शनशास्त्रासह ते कुठल्याही विषयावर प्रवचने देऊ लागले. संत कबीरांचे ते समकालिन होते. संत मिराबाई व मुक्ताई यांचे ते गुरू होते.

सकाळी ह.भ.प. उद्धव महाराज चन्ने यांचे प्रवचन झाले. तर रात्री ह.भ.प. मारुती महाराज झिरपे यांचे जाहीर हरीकीर्तन झाले. याप्रसंगी ह.भ.प. मोहन महाराज सुडके, ह.भ.प. तुकाराम महाराज चन्ने, अमोल गर्जे, राजेंद्र पोंधे, नारायण पाचर्णे, रोहिदास पाचर्णे, छबू आण्णा वाघ, भगवान पाचर्णे, शंकर पाचर्णे, हरिभाऊ पाचर्णे, सुधीर बांगर, संतोष ढोले, पप्पू ढाळे, विठ्ठल साप्ते, एडके मेजर, बाळू बांगर, संतोष पाचर्णे, चंदू पाचर्णे, निवृत्ती पाचर्णे, आदिनाथ पाचर्णे आदि प्रतिष्ठितांसह ग्रामस्थ महिला व पुरुष मोठ्या संख्येने हजर होते