Breaking News

श्री कालभैरवनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त त्रिदिनात्मक कार्यक्रम


नेवासाफाटा/प्रतिनिधी/- नेवासा तालुक्यातील जागृत असलेल्या श्री क्षेत्र बहिरवाडी येथील श्री कालभैरवनाथांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त कलशारोहन कार्यक्रमासह त्रिदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि.३ फेब्रुवारी ते सोमवार दि.३ फेब्रुवारी या तीन दिवसाच्या कालावधीत शिवलीलामृत पारायण हभप एडव्होकेट. दीनानाथ महाराज पाठक, कर्जत येथील हभप प्रकाश महाराज जंजीरे, यांची कीर्तने होणार आहे. सोमवार दि.५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते प्रवरानदीच्या मध्यधारेवर नव्याने बांधण्यात आलेल्या श्री कालभैरवनाथांच्या मंदिरावर कलशारोहन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महंत चंद्रशेखर भारती महाराज,टोक येथील सिद्धेश्वर मंदिराचे महंत बालब्रम्हचारी महाराज, महंत सुनीलगिरी महाराज, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे उपस्थित रहाणार आहे. सोमवारी दि.५ फेब्रुवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या सकाळी ९ ते ११ यावेळेत होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने या त्रिदिनात्मक सोहळ्याची सांगता होणार आहे.