Breaking News

तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी घोलप,उपाध्यक्ष पदी नवगिरे


नेवासा/तालुका प्रतिनिधी/ - नेवासा तालुक्यातील पानेगाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय घोलप तसेच उपाध्यक्ष पदी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांची ग्रामसभेत निवड लोकनियुक्त सरपंच संजय जंगले, तसेच ग्रामविकास अधिकारी गणेश डोंगरे यांनी जाहीर केली. 
ग्रामसभेच्या अध्यस्थानी पानेगाव संस्थेचे मार्गदर्शक जालिंदर जंगले हे होते. यावेळी समिती सदस्य म्हणून पाराजी गुडधे, पोपटराव गागरे, रंगनाथ जंगले, डॉ. कडूबाळ काकडे, शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष किशोर जंगले. तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य कार्यकारी मंडळ त्यामध्ये काम करणार आहे. तंटामुक्तीचे सचिव म्हणून गावातील पोलीस पाटील बाबासाहेब जंगले हे आहे . पानेगाव ग्रामपंचायत सत्तांतर झाले असल्याने ह्या नुतन निवडी झाल्या असल्याचे उपसरपंच रामभाऊ जंगले यांनी सांगितले. नवनिर्वाचित तंटामुक्ती चे अध्यक्ष घोलप व उपाध्यक्ष नवगिरे यांचे अभिनंदन शेवगाव उपविभागीय पोलिस उप अधिक्षक अभिजित शिवथरे, माजी आमदार शंकरराव गडाख, जेष्ठ पत्रकार मनोज आगे, विष्णु वाघ, अशोकराव सोनवणे, सोपानराव दरंदले आदींनी केले.