3 मार्चपासून दिंडी सोहळा
हा दिंडी सोहळा श्री संत गोदड महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्जत भुमीतून सुरू होते. श्री संत गोदड महाराज यांना साक्षात पांडूरंगाने दर्शन देवून आज्ञा केली की गोदडनाथा तू माझे दर्शनास येवू नको. मीच तुझ्या भेटीसाठी कर्जतला येईल. तुझी दिंडी माञ तुझ्या गुरूच्या भेटीला पैठणला दर षष्ठी वारीला जात जावे म्हणून कर्जतच्या श्री गोदडनाथांची दिंडी ही पैठणला गुरू नाथाच्या दर्शनास जाते. कर्जत वरून अनेक दिंडया पैठणला जात असतात. कर्जत पासून पैठण पर्यंत प्रत्येक वाडी, वस्ती व गावात या दिंडीचे मनापासून स्वागत लोक करतात. स्वयंस्फुर्तीने लोक या दिंडीतील वारकरर्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आनंदाने करत असतात.
