जिल्हास्तरीय क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा
उद्घाटनपर भाषणात डॉ. बांदल यांनी आजच्या या धकाधकीच्या जीवनात खेळाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. राज्य व देश पातळीवर उत्कृष्ठ खेळाडू घडविण्याचे काम जनशक्ती क्रीडा मंडळ आज अहमदनगर जिल्ह्यात करत आहे. मुलांनी आज इतर आधुनिक साधनांच्या मागे न पळता शरीर सुदृढ करण्याच्या दृष्ठीने मैदानात उतरले पाहिजे असे सांगितले. यावेळी अध्यक्षीय भाषणात काकडे यांनी 21 व्या शतकात मुले व युवक आज शरीर संपत्तीकडे लक्ष देत नाहीत. खेळाडूंना व युवकांना जीवनात अभ्यासाबरोबर विविध खेळाच्या माध्यमातून शरीर व आरोग्य निरोगी राहणे तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्याचे काम जनशक्ती क्रीडा मंडळ अहमदनगर जिल्ह्यात रात्रंदिवस करत आहे असे सांगितले. यावेळी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बाळासाहेब बुगे ( गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, शेवगाव ), उदय जोशी ( जिल्हा क्रीडा अधिकारी अ.नगर ), नंदकिशोर रासने ( क्रीडा अधिकारी), भाग्यश्री काकडे, सचिव परवीन पटेल, प्राचार्य भानुदास भिसे, प्राचार्य प्रकाश व्यास, रावसाहेब बर्वे, बाबासाहेब लांडगे, क्रीडा शिक्षक अविनाश हंडाळ, प्रशिक्षक आकाश मोहिते, शिरसाठ मोहिनी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक कल्पेश भागवत यांनी तर रामेश्वर पालवे यांनी आभार मानले.