Breaking News

दहिगाव-ने घुले विद्यालयात 10 वी विद्यार्थ्यांचा निरोप


शालेय जीवन विविध घडामोडींमुळे आयुष्यभर आठवणीत राहते. विद्यार्थी दशेत आई वडीलांनंतर संस्कारक्षम शिक्षण गुरूजनांकडूनच मिळते. त्या शिक्षणाधारेच विद्यार्थ्यांनी आज्ञाधारी बनले पाहिजे. अभ्यासू वृत्ती ठेवावी. ग्रंथ हे गुरू या प्रमाणे वाचन संस्कृती जोपासावी. त्यातून ज्ञान प्राप्ती होते. आपण अभ्यासू वृत्ती अंगी बाळगल्यास आपल्या आयुष्यात निश्‍चितच परिवर्तन घडेल कारण आपल्या आयुष्याचे शिल्पकार आपण स्वतःच असल्याचे प्रतिपादन दहिगाव ने उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे यांनी केले. दहिगाव-ने येथील मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या नवजीवन विद्यालयात 10 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शनपर आयोजित निरोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य विष्णू मरकड होते. यावेळी सरपंच सुभाष पवार, उपसरपंच सूर्यकांत पाऊलबुद्धे, प्रशासकीय अधिकारी के. के. पवार, उपप्राचार्य गोरक्षनाथ ठोंबळ, प्रा. बापूसाहेब लोढे, प्रा. काकासाहेब घुले, भगवान पागर, राजेंद्र पानगव्हाणे, दीपक खरात, मच्छिंद्र पानकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वाचन संस्कृती जोपासावी. अभ्यासू वृत्ती अंगी बाळगत आवडीच्या क्षेत्रात उत्तम करीअर घडवावे असे मत प्राचार्य व्ही. एस. मरकड यांनी यावेळी व्यक्त केले. यावर्षी आदर्श विद्यार्थी भाग्यश्री बाबासाहेब मरकड, कोमल रमाकांत सोनवणे, आल्फिया याकुब शेख, व ऋतुजा चंद्रकांत जोशी तर आकाश गोरक्ष तागड या पाच आदर्श विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. काकासाहेब घुले यांनी तर, सुत्रसंचालन विद्यार्थी स्नेहल शिंदे व वैभव सातपुते यांनी केले. तर आभार प्रा. सिकंदर शेख यांनी व्यक्त केले.