Breaking News

मुलीचा विनयभंग, दोघांवर गुन्हा दाखल


सोलापूर, - एकतर्फी प्रेमातून धमकी देत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग केल्याप्रकरणी चिंचोलीकाटी (ता. मोहोळ) येथील दोघांवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला आहे. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : अजय बजरंग गायकवाड व बाळू नवनाथ भालेराव, दोघे रा. चिंचोलीकाटी, ता. मोहोळ यांनी संगनमताने अल्पवयीन मुलगी घराच्या बाहेर पडल्यानंतर रोडवर जून 2017 पासून ते 19 फेब्रुवारी 2018 दरम्यान अजय गायकवाड याने पाठीमागे वाईट भावनेने येऊन मी तुझ्यावर प्रेम करतो, तू करतेस का नाही, फक्त तू हो म्हण, तुझ्या घरी बोलतो असे म्हणून धमकी दिली. त्यानंतर मुलीने झाल्या प्रकाराबाबत भावास सांगत असताना तेथे बाळू भालेराव याने येऊन तुझ्या बहिणीला अजय गायकवाड याने बोलावले आहे, असे सांगून पीडित मुलीच्या मनास लज्जा वाटेल, असे कृत्य केले. त्यावेळी पीडित मुलीच्या भावाने माझ्या बहिणीची बदनामी का करता, असे म्हणताच भालेराव याने त्यास शिवीगाळ करून दमदाटी करत मारहाण केली.