सोलापूर, - देशी गायीचे मानवाच्या आरोग्यसंवर्धनाच्या दृष्टीने आणि शेतीसाठी अनेक फायदे आहेत. दूध व तूप हे अनेक आजारावर औषधी आहे. गोमूत्र हे चांगले वेदनाशामक आहे. गायीमुळे शेतीसह मानवी आरोग्याचे संवर्धन होईल. गोमूत्र व शेण हे शेतीसाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे देशी गायींचा सांभाळ करा, असे आवाहन उत्तम माहेश्वरी यांनी केले. येथील प्राणिमित्र धन्यकुमार पटवा व त्यांच्या सहकार्यांनी येथील चव्हाण सभागृहात आयोजिलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. नवनाथ दुधाळ होते.डॉ. दुधाळ यावेळी बोलताना म्हणाले, देशी गायीच्या पंचगव्य व त्यापासून तयार झालेले औषध हेच आपल्याला आनंदी व निरोगी ठेवू शकतात. पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पराग यांनी पशुसंवर्धनाबाबत माहिती दिली. विलास शहा यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, सुचित्र गडद, यशवंत सुर्वे, शाळू महाराज, राजा काकडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
गायीमुळे शेतीसह मानवी आरोग्याचे संवर्धन होईल -उत्तम माहेश्वरी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:45
Rating: 5