Breaking News

प्राप्त हरकतींची सुनावणी घ्या - विजयकुमार देशमुख

सोलापूर - पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यावर एक हजार 136 सूचना, हरकती प्राप्त झाल्या आहेत. या सर्व हरकतींची सुनावणी घेण्याचे आदेश पालकमंत्री तथा पंढरपूर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष विजयकुमार देशमुख यांनी दिले. यामध्ये मुदतीत 580 आणि मुदतीनंतर 556 हरकती प्राप्त झाल्या आहेत. विकास आराखडा राबविताना शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता सदस्यांनी घ्यावी. सदस्य व संबंधित अधिकारी यांनी जागा, रस्त्यांची पाहणी करून अहवाल सादर क रावा, अशाही सूचना पालकमंत्री यांनी केल्या. पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यावर, प्राप्त हरकतींवर सुनावणीबाबत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. 


पंढरपूर विकास प्राधिकरण आराखड्यासंदर्भात मुदतीत 580 आणि मुदतीनंतर 556 हरकती प्राप्त झाल्या आहेत. या सर्व हरकतींची सुनावणी घेण्यात यावी. सर्व गावातील रेडिरेक नर उपलब्ध करून घ्यावा. भूसंपादन करताना राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर मोबदला देण्याबाबत आमदार बबनराव शिंदे यांनी केलेल्या सूचनेचाही विचार करावा, अशा सूचना पालक मंत्री यांनी जिल्हा प्रशासनास केल्या. मुदतीत प्राप्त झालेल्या 580 हरकतींची सुनावणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर यांच्या कार्यालयात 3, 4, 10 व 11 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. 3 मार्च रोजी रोजी कासेगाव, आढीव येथील 98 हरकतींवर सुनावणी होणार आहे. 4 मार्च रोजी गादेगाव, गोपाळपूर, कौठाळी येथील प्राप्त 151 हरकतींवर, 10 मार्च रोजी मुंढेवाडी, टाकळी, भटुंबरे, देगाव, भंडीशेगाव, चिंचोली भोसे, पंढरपूर, बोहाळी येथील प्राप्त 150 हरकतींवर तर 11 मार्च रोजी वाखरी, मुंढेवाडी, शेगाव दुमाला, शेळवे, लक्ष्मी टाकळी येथील प्राप्त 181 हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या 556 हरकतींची सुनावणी 23 ते 25 मार्च रोजी उपविभागीय अधिक ारी कार्यालय, पंढरपूर येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती नगररचना विभागाचे सहायक संचालक नाळे यांनी दिली.