वधूवरांच्या सुविधेसाठी स्मरणीकेचे प्रकाशन - मंत्री लोणीकर
सोनार समाजाच्या वधु वर मुलां मुलीची माहिती राज्यातील सोनार समाजापर्यंत पोहचावी या उद्देशाने महासंघ काम करीत आहे. त्याचा भाग म्हणून या स्मरणीकेचे प्रकाशन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन जालना जिल्हयाचे पालकमंञी तथा पाणी पुरवठा मंञी ना. बबनराव लोणीकर यांनी केले.
ना. लोणीकर पुढे म्हणाले की, सोनार समाजातील गोर गरीब कुटूबांतील उपवर मुला मुलींची माहिती या रेशीम बंध स्मरणीकेच्या रूपाने होणार असून वधुवर पाहण्यास जाणारा वेळ व पैसा वाचेल. यापेक्षाही मनस्ताप फार कमी होईल. सोनार सेवा महासंघाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याने समाजाने याचा लाभ घ्यावा असे आवाहनही ना. लोणीकर यांनी केले. या स्मरणीकेच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवा संघाचे संस्थापक चंद्रकांत डहाळे हे होते. ना. लोणीकर यांचा सत्कार राज्य महिला प्रमुख रेखाताई नवसे याच्या हस्ते करण्यात आला. तर या कार्यक्रमास मधुकर टाक, संतोष डहाळे, प्रशांत टाक, रेखाताई नवसे, अनिता शहाणे, हर्षदा नवसे, किरण डहाळे, बंजरग खर्जुले, रषेश बेद्रे, सुरेंद्र शेडुते, डॉ वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. तर चंद्रकांत डहाळे, गोविंद अंबिलवादे, रेखा नवसे याची भाषणे झाली.