Breaking News

झाकीर नाईकचे पुस्तक शाळेच्या अभ्यासक्रमात !


बिजनोर : वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईक याच्या पुस्तकाचा समावेश अभ्यासक्रमात करण्याचा पराक्रम एका शाळेने केला आहे. उत्तर प्रदेशमधील बिजनोर शहरातील ढोकी येथील एका खासगी शाळेने हा अजब प्रकार केला. विशेष म्हणजे या शाळेला राज्य सरकारची मान्यता आहे. शाळेत असा प्रकार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची सत्यता तपासण्यासाठी प्राथमिक शिक्षण अधिकार्‍यांचे पथक पाठवण्यात आले होते. या पथकाने शाळेची पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बांगलादेशमध्ये जुलै 2016मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नाईक यांचे नाव समोर आले होते. नाईक दहशवाद्यांना मदत करत असल्याचे तेव्हा तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर भारतातील अनेक संस्था त्याचा शोध घेत आहेत.