केज : बीड जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघातात चारजण ठार झाले आहेत. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा देऊन परतणार्या विद्यार्थ्याच्या दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या धक्क्याने टेम्पोचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंबाजोगाईजवळ मोटारसायकलच्या धडकेत मायलेकीचा, तर बीड बायपासवर दोन ट्रकच्या अपघातात क्लिनरचा मृत्यू झाला. नेकनूर-केज रस्त्यावर बरड फाटा येथे घडला. नांदूरफाटा येथील विकास अशोक ठोंबरे (वय 18) हा सारणी सांगवी येथील महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. प्रात्यक्षिक परीक्षा दिल्यानंतर सारणी सांगवी येथून मोटारसायकलवर (एम.एच.23 आर.4804) तो नांदूरफाट्याकडे निघाला होता. टेम्पोने (एम.एच.23 7508) मोटारसायकलला धडक दिल्याने विकास ठोंबरे हा जागीच ठार झाला. चालक अशोक आत्माराम कानडे याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अपघातात विद्यार्थी ठार; चालकाची आत्महत्या
Reviewed by Dainik Lokmanthan
on
22:45
Rating: 5