जमिनीच्या वादातून शेतकर्याने जिल्हाधिकारी कार्यालयात साबण खाल्ले
बीड (प्रतिनिधी) दोन्ही मुलांनी मारहाण करून आपली जमीन हडपल्याचा आरोप करत एका वृध्द शेतकर्याने नैराश्यातून साबण खाल्ल्याचा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडला. साबण खाल्ल्यामुळे शेतकरी अत्यावस्थ झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकाराने जिल्हाधिकारी क ार्यालयाच्या आवारात खळबळ उडाली होती.
पाटोदा तालुक्यातील भायाळा येथील लिंबा गणपत बांगर (80) यांनी काल दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या आवारात कपडे धुण्याची साबण खाल्ली. त्यामुळे ते बेशुध्द होवून खाली कोसळले, त्यांना तातडीने निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांच्या गाडीमधून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
बांगर यांची जमीन भायाळा परिसरात आहे. परंतु जमिनीच्या वादातून त्यांची दोन्ही मुले त्यांना सतत त्रास देत होती. त्याबाबत नेहमीच त्यांनी पोलिस प्रशासनाला याविषयी माहिती दिली. मात्र कोणतीच कारवाई न झाल्याने नैराश्यातून काल जिल्हाधिकारी कार्यालयात कपडे धुण्याचे साबण खात आत्महत्याचा प्रयत्न बांगर यांनी केला. याची तात्काळ दखल निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांनी घेतली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या बांगर यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांच्या गाडीतून हलविण्यात आले. यामुळे पुढील अनर्थ टळला. परंतु जमिनीसाठी बापाचे वैरी झालेले दोन्ही मुलांना अद्यापही अटक न झाल्याने अश्चर्य व्यक्त केले जात आहे.