पुणे : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर उभा केलेला चित्रपटाचा सेट तत्काळ काढावा, असे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत. त्याचबरोबर तो न काढल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. विद्यापीठाने मंजुळे यांच्याबाबत आतापर्यंत सहानुभूतीची भूमिका घेतली होती. मात्र, आता मंजुळे यांनी आदेशाचे पालन केले नाही तर कारवाई करण्यात येईल, असेही विद्यापीठाने बजावले आहे. नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटासाठी विद्यापीठाचे मैदान उपलब्ध करून दिल्याने राज्य शासनाने यावर आक्षेप घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ.नितीन करमाळकर यांनी सात दिवसात सेट काढून घेण्याचे आदेश दिले होते. मात्र याला अनेक दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही सेट काढून घेण्याबाबतीत कोणत्याही हालचाली न झाल्याने आज हा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.
विदयापीठाचा नागराज मंजुळेवर कारवाईचा बडगा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:00
Rating: 5