Breaking News

जोग महाराज संस्थानकडून भूमिपुत्रांचा सन्मान !


रोजी आखेगाव येथील श्री जोग महाराज संस्थान केंद्राच्या वतीने पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वारकरी संप्रदायाचे तत्त्व व नियम त्यांचे काटेकोरपणे पालन करत असताना विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजोन्नती पूरक कार्य श्री जोग महाराज संस्कार केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे. सालाबादप्रमाणे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त पंचक्रोशीतील गुणवत्ताप्राप्त भूमिपुत्रांचा सन्मान करण्यात आला. भारतीय निवडणूक ज्ञान स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त चैतन्य सोमनाथ मूरदारे, राष्ट्रीय खेळाडू अंकिता संदीप खरड व रोप स्किपिंग स्पर्धेत सुवर्ण व रौप्यपदक विजेती श्रावणी श्रीकांत मिसाळ यांना ह. भ.प. कृष्णदेव महाराज काळे व ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांचे हस्ते पदक, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चैतन्य मुरदारे व श्रावणी मिसाळ यांनी आपल्या यशाचे रहस्य मनोगत व्यक्त करताना अगदी बोलके अनुभव सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात कृष्णदेव देव महाराज काळे म्हणाले की, सत्कार हा सत्कार्यासाठी असतो. ध्येयपूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास कोणत्याही क्षेत्रामध्ये निश्‍चितच यश संपादन करता येते. कुणीही उपजत गुणवान नसतो. कुटूंब समाज शाळा आणि स्वत:चे प्रयत्न यामुळे मणुष्य जीवनात यश संपादन करू शकतो. प्रेरणा देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. यावेळी हरीहरेश्‍वर संस्थानचे ह.भ.प. गणपत महाराज, विष्णू महाराज टेंभूकर, संदीप खरड, काकासाहेब डोंगरे, लक्ष्मण डोंगरे, राम उदागे, नीलेश मोरे, वृद्धेश्‍वर कंठाळी, श्रीकांत मिसाळ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.