Breaking News

शेवगाव तालुक्यासाठी अहमदनगर जिल्हाच योग्य


तालुका उत्तरेकड जोडण्यास शेवगाव तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने व विविध पक्षांच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. शेवगाव तालुक्यातील नागरिकांना सर्व सोयी सुविधांच्या बाबतीत अहमदनगर जिल्हा सोयीस्कर आहे. ठराविक राजकीय चांडाळ चौकडीसाठी, जर शेवगांव तालुका उत्तरेकड जोडणार असाल तर हे दुर्दैवी आहे. तरी विभाजनाच्या दृष्टीने शेवगाव तालुका हा अहमदनगर जिल्ह्याला जोडण्यात यावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेवगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारिप बहुजन महासंघ महाराष्ट्र, नवनिर्माण सेना, यांच्या वतीने शेवगावचे तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना तसेच अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आली आहेत. यावेळी कॉम्रेड संजय नागरे, अजय मगर, विशाल इंगळे, विजय बोरूडे, अक्षय चित्ते, प्रशांत मगर, प्यारेलाल शेख, प्रकाश वाघमारे, विनोद मगर, अनिल बोरूडे, राजू मगर, प्रदिप मोहिते, सुहास मगर, जयश्री ससाणे, अशोक ससाणेंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.