Breaking News

आ. थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नोकरी महोत्सव


संगमनेर प्रतिनिधी :- तालुक्यासह जिल्ह्यातील युवक युवतींना करिअरची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे माजीमहसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या बुधवारी {दि. ७ } येथील संपर्क कार्यालय ‘यशोधन’ प्रांगणात भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय पातळीवरील ६० कंपन्यांचा सहभाग आहे, अशी माहिती जि. प. सदस्य मिलींद कानवडे यांनी दिली. या महोत्सवाचे उदघाटन आ. थोरात यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुधीर तांबे हे असतील. यावेळी रणजितसिंह देशमुख, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, नागराध्यक्षा दुर्गा तांबे, कांचन थोरात, इंद्रजित थोरात, सत्यजित तांबे, भागवत डोईफोडे, साहेबराव सोनवणे, अशोकराव थोरात, अमित पंडित, शरयु देशमुख, मनिष मालपाणी, हरीभाऊ वर्पे, अजय फटांगरे, रामदास वाघ, शिवाजीराव थोरात, निशा कोकणे, विश्‍वासराव मुर्तडक, सतिष कानवडे, मिरा शेटे, लक्ष्मणराव कुटे, भाऊसाहेब कुटे, बाबा ओहोळ, लहानभाऊ गुंजाळ, रामहरी कातोरे, दिलीप पुंड, महेंद्र गोडगे, नवनाथ अरगडे, भाऊसाहेब एरंडे, योगेश भालेराव आदी उपस्थित राहणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता ९८३४६३०८१२ आणि ९२२५२५१२३४ मोबाईल या नंबरवर संपर्क साधावा. या महोत्सवात जास्तीत जास्त तरुण, तरुणींनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवराय निर्माण संघटना व संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.