Breaking News

सरपंच व ग्रामपंचायत आपल्या दारी या अभिनव उपक्रमास जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद


नगर ता प्रतिंनिधी : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायतने प्रभारी सरपंच तथा उपसरपंच शरद खंडू पवार यांच्या संकल्पनेतून सरपंच , ग्रामपंचायत आपल्या दारी हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून यामध्ये महिन्यातील पाच दिवस प्रत्येक वार्डातील ग्रामपंचायत सदस्य , ग्रामविकास अधिकारी , सफाई कर्मचारी , पाणीपुरवठा कर्मचारी , विद्युत कर्मचारी , ग्रामपंचायत लेखनिक या सर्वांना सोबत घेवून दररोज एक वार्ड याप्रमाणे प्रभातफेरी घेण्यात येणार आहे . या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ नुकताच वार्ड क्र १ पासून करण्यात आला यामध्ये ग्रामस्थांनी पाणी पुरवठा , रस्ते , बंदीस्त गटार , स्वच्छता याबाबत समस्या मांडल्या त्या सर्व समस्यांची नोंद व्यक्तीनिहाय करण्यात आली व तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले . दारूबंदीबाबत आलेल्या तक्रारींवरही अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांना बंद करण्याचे सुचविले . निर्मल स्वच्छ भारत आभियानांतर्गत शौचालय नसलेल्या ग्रामस्थांना शौचालय बांधण्यासाठी आवाहन करण्यात येवून शासनाच्या योजनेबाबतही माहीती देण्यात आली .दारात येवून ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांचे स्वागतही करत होते व मनमोकळेपणाने समस्याही मांडत होते . निवडणुकीपुरते दारात न येता जनतेच्या समस्यांसाठी व गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे लोकांनी भरभरून कौतुक केले . यामध्ये गटविकास अधिकारी सय्यद मॅडम , ग्रामपंचायत विभागाचे खाडे साहेब , उपसरपंच शरद पवार , मा .सरपंच अर्चना चौधरी , नगर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक कोकाटे , प्रकाश ठोंबरे सर , दिलीप पवार , संदीप सुरवसे , ग्राम .पं . सदस्य महेश जगताप , संतोष कोकाटे , कमलताई माळी , ग्रामविकास अधिकारी वाळके भाऊसाहेब , पाणी पुरवठा विभागाचे चंद्रकांत पवार , छबुराव कोकाटे , माणिक हजारे ,लेखनिक विष्णु भद्रे , स्वच्छता व विद्युत विभागाचे राजु तनपुरे , संजय गाडे तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते .