Breaking News

लक्ष्मीमाता मंदिरात नवीन मूर्तीची प्रतिष्ठानपणा मोठ्या उत्साहात


नगर - भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माळीवाडा येथील लक्ष्मीमाता मंदिरात आज नवीन मूर्तीची प्रतिष्ठानपणा मोठ्या उत्साहात होत आहे ही सर्वांच्यादृष्टीने आनंददायी गोष्ट आहे. परिसरातील हे लक्ष्मीमातेचे मंदिर जागृत व नवसाला पावणारी असल्याने भाविकांची मोठी श्रद्धा आहे. भाविकांच्या सहकार्याने होत असलेला मंदिराचा विकास खरोखर कौतुकास्पद असाच आहे. त्यामुळे या मंदिर परिसराच्या विकासासाठी यापूर्वी सुशोभिकरण खासदार निधीतून केले आहे, यापुढेही आपण भरीव मदत देणार असल्याचे प्रतिपादन खा.दिलीप गांधी यांनी केले. माळीवाडा येथे मातंग समाज पंचकमिटीच्यावतीने श्री महालक्ष्मी मातेच्या नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी शोभायात्रेचा शुभारंभ खा. दिलीप गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मातंग समाज पंच कमिटी अध्यक्ष श्रीकांत साठे, उमेश साठे, ज्ञानेश्‍वर रासकर, मनेश साठे, नगरसेवक कैलास गिरवले, अशोक बाबर, डि.जी.साठे आदि उपस्थित होते. यावेळी श्रीकांत साठे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून या मंदिराच्या विकासासाठी विविध निधीच्या माध्यमातून सुशोभिकरण सुरु आहे. तसेच भाविकांच्या सहकार्याने या ठिकाणी एक चांगले मंदिर उभे राहिले आहे.