Breaking News

निमगाव वाघा येथे शिवजयंती निमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा उत्साहात विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त सहभाग

गर तालुक्यातील निमगाव वाघा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त नेहरु युवा केंद्र तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, नवनाथ विद्यालय, युग करिअर डेव्हलपमेंट व श्री नवनाथ युवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने निसर्ग व व्यक्तीचित्रण हुबेहुब कागदावर रेखाटले. तर निबंध स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, कार्य व आजचा समाज यावर आपल्या भावना शब्दबध्द केले. 


पै.नाना डोंगरे म्हणाले की, जगात कलेला मोठे महत्त्व असून, चित्रकला प्रभावी माध्यम म्हणून पुढे येत आहे. मोबाईलमध्ये गुरपटलेल्या विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अंगी विविध कला गुण असतात. त्यांच्यातील कला व प्रतिभेला वाव देण्यासाठी शिवजयंतीचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे पै.नाना डोंगरे यांनी सांगितले.
निबंध व चित्रकला स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणार्‍या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षिस शिवजयंती दिनी गावात होणार्‍या कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्र.मुख्यध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, युग करिअर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष नितीन जमदाडे, काशीनाथ पळसकर, चंद्रकांत पवार, निळकंठ वाघमारे, गोविंद बोरुडे, दत्तात्रय जाधव, उत्तम कांडेकर, सौ.मंदा साळवे, डोंगरे संस्थेच्या सचिव मंदा डोंगरे, तुकाराम खळदकर, नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, प्रियंका डोंगरे, मयुर काळे आदिंनी परिश्रम घेतले.