Breaking News

‘महाडीबीटी’ पोर्टलचा फज्जा

पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांकडून ‘महाडीबीटी’ पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले. मात्र या पोर्टलचा फज्जा उडाल्याने, त्याचा मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावे लागत आहे. तंत्रशिक्षण संचालनालयने पूर्वीप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. ‘महाडीबीटी’चा प्रयोग फसल्याने शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना दोन वेळा अर्ज करण्याची वेळ आली आहे.


व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणार्‍या पात्र विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी) आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजने अंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांपर्यंत आहे, अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक व परीक्षा शुल्कांच्या 50 टक्के शिष्यवृत्ती ईबीसीद्वारे देण्यात येते. तर निर्वाह भत्ता योजना अल्पभूधारक शेतकरी व मजूर पाल्यांना प्रतिमहा 3 हजार रुपये दहा महिन्यांसाठी दिला जातो.या दोन्ही योजनेसाठी पहिल्यांदाच महाडीबीटी’ पोर्टल राज्य शासनाने कार्यान्वित केले. त्यानुसार यावर्षी अर्थात 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले. मात्र पोर्टलवर अर्ज करताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. काही विद्यार्थ्याना अर्जच करता आले नाही. त्यामुळे या पोर्टलचा फज्जा उडाला. त्याचा परिणाम म्हणून अद्यापपर्यंत एकाही विद्यार्थ्यांना या दोन्ही योजनेची शिष्यवृत्ती मिळाली नाही.या सर्व पार्श्‍वभूमीवर तंत्रशिक्षण संचालनालयने अखेर या पोर्टलवरून या दोन्ही वगळण्याचा निर्णय निर्णय घेतला. त्यानुसार परत एकदा आता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे सूचित केले आहे.