Breaking News

गुजरातमध्ये नगरपालिका निवडणूकांत भाजपची घसरगुंडी


अहमदाबाद/वृत्तसंस्था : गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आता जाहीर झाले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार भाजप 44 जागांवर आघाडीवर आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भाजपच्या 15 जागा कमी झाल्या आहेत. गुजरातमध्ये 75 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. याशिवाय 2 जिल्हा पंचायत, 17 तालुका पंचायत तर 1400 ग्राम पंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या आहेत. नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये 1900 वार्डमधून उमेदवार उभे केले होते. यातील 1147 उमेदवार विजयी झाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाडनगरमध्ये भाजप 28 पैकी 27 जागांवर विजयी झाले आहे. विजय रूपाणींच्या आमदारकी क्षेत्रातसुद्धा भाजपला विजय मिळवण्यात यश मिळवलं आहे. तर 900 वार्डांमध्ये आपण विजय मिळवला आहे असा दावा काँग्रेसने केला आहे. गेल्या वर्षी 59 नगरपालिकांमध्ये भाजपला विजय मिळाला होता. एकंदर भाजपने या निवडणुकांमध्ये विजय मिळवला असला तरी त्यांच्या जागा मात्र विलक्षण कमी झाल्या आहेत. या निवडणुकीत 530 मतदान केंद्र ही संवेदनशील जाहीर करण्यात आली होती. हे मतदान 17 फेब्रुवारीला झालं होते.