Breaking News

म्हस्केवाडीचे सचिन पानमंद अखिल भारतीय दिव्यांग संमेलनाचे अध्यक्ष अळकुटी ग्रामिण पतसंस्थेतर्फे सत्कार


अखिल भारतीय 7 व्या दिव्यांग साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी म्हस्केवाडी, ता. पारनेर येथील युवक, नाशिक जिल्हा प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष सचिन गंगाराम पानमंद यांची निवड नुकतीच करण्यात आली. अळकुटी ग्रामीण पतसंस्थेच्यावतीने चेअरमन महेश शिरोळे यांनी त्यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. पानमंद हे म्हस्केवाडी येथील विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, सह्याद्री मंगल कार्यालयाचे संस्थापक गंगाराम पानमंद यांचे कनिष्ठ चिरंजीव असुन सह्याद्री ट्रान्सपोर्टचे सुरेश पानमंद, चंद्रकांत पानमंद यांचे बंधु आहेत. नाशिक येथील शिवसह्याद्री सामाजिक संस्था तसेच दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक कार्य करत आहेत. ते दिव्यांग व्यक्तींना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कायम अग्रेसर असतात. त्यांच्या माध्यमातून अनेक दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. सचिन पानमंद यांच्या कार्याची ओळख संपुर्ण महाराष्ट्रात आहे. त्यांच्या कार्याची पावती म्हणुनच अखिल भारतीय 7 व्या दिव्यांग साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सत्काराबद्दल ते म्हणाले की, जनतेचे आशिर्वाद पाठीशी अल्यामुळे सामाजिक कार्य करतांना आपणांस उर्जा मिळत आहे. सर्वांना न्याय मिळावा यासाठी मी सतत प्रयत्न करत असतो. सर्वांना बरोबर घेवून या क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे समर्थपणे काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. यावेळी सह्याद्री ट्रान्सपोर्टचे चंद्रकांत पानमंद, पाडळीआळेचे सरपंच भाऊसाहेब डेरे, पुष्पा डेरे, हॉटेल रायगडचे संस्थापक भाऊसाहेब शिरोळे, राजेंद्र शिंदे प्रतिष्ठाणचे रविंद्र गोर्डे, आदिनाथ म्हस्के, अळकुटी ग्रा. पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय पंडीत, संपत निमसाखरे, बाळू चव्हाण, व्यवस्थापक सुरेश घोलप, विश्‍वास लामखडे, जावेद शेख, शत्रुघ्न भोसले, गणेश शिरोळे, सतिश शिरोळे, नितीन शिरोळे, संतोष शिरोळे आदि मान्यवर उपस्थित होते.