Breaking News

शिवसेना ता. प्रमुख पदी शहाजी राजेभोसले यांची निवड

जामखेड / ता. प्रतिनिधी ।- शिवसेना जामखेड तालुका प्रमुख पदी शिवसेनेचे कट्टर समर्थक शहाजी राजेभोसले यांची निवड झाली. यावेळी निवडीचे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या हस्ते अहमदनगर येथे त्यांना देण्यात आले. जामखेड तालुक्यातील शिवसेना स्थापनेचे शिल्पकार कै. महादेव आप्पा राळेभात आणि शिर्डी मतदारसंघाचे शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे उपनेते रमेश खाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिक म्हणून काम करणारे युवा नेते शहाजी राजेभोसले यांना जामखेड तालुका प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले.

यावेळी नवनिर्वाचित तालुकाप्रमुख राजेभोसले म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून 5 वर्षे जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खादी ग्रामोद्योग महामंडळाचे सलग 10 वर्षे संचालक आणि 5 वर्षे नान्नज ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून काम केले आहे. तसेच जामखेड तालुक्यामध्ये शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ राहून शिवसेना भाजप यांची युती असताना सलग 15 वर्षापासून शिर्डी मतदारसंघाचे खासदार व कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी युवकांनी एकजुटीने काम केले होते. त्यामुळे मी कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, वाड्यावस्तीपर्यंत शिवसेना पक्षाच्या शाखा स्थापन करणार आहे. यावेळी, जि. प. सदस्य व पारनेर तालुकाप्रमुख निलेश लंके, अहमदनगर मनपा चे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, जि.प. सदस्य संदेश कार्ले, नगर तालुका पं. स. चे सभापती रामदास भोर, जामखेड तालुका दुध संघाचे व जामखेड तालुका खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अंकुश उगले यावेळी उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्या नान्नज गावच्या ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष अमजद पठाण, मा. संरपच महेंद्र मोहळकर, नंदूसिंग परदेशी, लियाकत शेख, अमर चाऊस, आदम शेख, दादा कोळपकर, प्रकाश राऊत, भुंजग दळवी, युनूस पठाण, गोरख भवाळ, यांनी त्यांच्या सत्कार करून वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
जामखेड तालुक्यातील जूनी आणि नवीन शिवसेना एकत्र करून शिवसेना पक्ष हा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असून 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे राजेभोसले यांनी बोलताना व्यक्त केले.