Breaking News

विठ्ठल-रुख्मिनी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा संपन्न


कुकाणा/प्रतिनिधि/- नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारी येथे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज देवगड व वैकुंठवासी. बाळकृष्ण महाराज ,सावखेड यांच्या आशीर्वादाने व महंत गुरुवर्य रामगिरी महाराज येळेश्वर संस्थान येळी व मीराबाई महाराज मिरीकर यांच्या हस्ते विठ्ठल रुख्मिनी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा पार पडलाय.
वेदमंत्राच्या उच्चारात व ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात महंत रामगिरी महाराज येळेश्वर संस्थान येळी व मीराबाई महाराज मिरीकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुख्मिनी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व मंदिर कलशारोहन सोहळा उत्साहात संपन्न झालाय. यज्ञाला महाराजांच्या हस्ते पूर्णाहुती देऊन यज्ञाची सांगता झाली. मीराबाई महाराज मिरीकर यांच्या किर्तनाने कार्यकाचा समारोप झाला. वारकरी संप्रदाय हा उपासना संप्रदाय असल्याचं व मंदिर बांधा पण मंदिराचे पावित्र्य राखले गेले पाहिजे अस मीराबाई महाराज मिरीकर यांनी सांगितलं. यावेळी गणेशानन्द महाराज, अंकुश महाराज कादे, नारायण दाभाडे, रखमाजी लिपणे, सरपंच सतीश कर्डीले, मच्छिंद्र लिपणे, सुरेश दाभाडे, गोरक्षनाथ राजमाने, विलास लिपणे, आगळे साहेब, सूर्यकांत गुंड, सुनील कर्डीले, श्रीराम गुंड, राजेंद्र लिपणे, अशोक महाराज कचरे, भागवत दाभाडे, ज्ञानेश्वर महाराज लिपणे, दगडू खलाटे संजय लिपणे,आदींसह महिला व भाविकांची मोठी उपस्थिती होती.