Breaking News

एन. डी. आर .फ. च्या जवानांनी केले महसूलच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन


शिर्डी / प्रतिनिधी :- पुण्याच्या तळेगाव येथील एन. डी. आर. फ.च्या बटालियनच्या जवानांनी राहाता येथील महसूलसह इतर विभागातील कर्मचारी व पोलिसांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये येणाऱ्या अडचणी, त्यावरचे उपाय आणि मार्ग याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन करत प्रात्यक्षिक दाखविले. एन. डी. आर. फ.चे प्रमुख अधिकारी अनुपम श्रीवास्तव आणि टीम प्रमुख एस. के. सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. भूकंप पूर्व परीस्थिती आणि दुर्घटनेच्यावेळी कमीतकमी वेळेत घटनास्थळी जवान पोहचण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र ही वेळ फार महत्वाची असते. त्यावेळी घटनेत जीव वाचविण्यासाठी काय उपाय करता येतात, त्यासाठी काय दक्षता घेतली, पाहिजे कुठली काळजी घेतली पाहिजे, याविषयी श्रीवास्तव यांनी मार्गदर्शन केले. 
ते म्हणाले, की अप्रिय घटना कधी, कोठे, कशी घडेल, हे सांगता येत नाही. मात्र अशा वेळी आवश्यक असणाऱ्या विविध विभागांनी एकमेकांची माहिती जवळ ठेवली पाहिजे. ज्या साहित्याची तात्काळ गरज असते, त्या यंत्रणेचे लोक मनुष्यबळ गर्दीवर कंट्रोल व कोणी अफवा पसरवणार नाही किंवा जनतेत घबराट निर्माण होणार नाही, याची काळजी तलाठी, नागरिक आणि तहसीलचे कर्मचारी व पोलिसांनी सुद्धा घेतली पाहिजे. त्यानंतर त्यांनी शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेतले. कोपरगाव, राहुरी, राहाता येथे हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. दि. १५ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण नगर जिल्ह्यात याविषयी माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.