Breaking News

रंगदास स्वामीच्या मंदिराचा कलशारोहन सोहळा


पारनेर / प्रतिनिधी/- पारनेर तालुक्यातील कन्हेर ( पोखरी ) येथे श्री रंगदास स्वामीच्या नवीन मंदिराचा भव्य कलशारोहण सोहळा बुधवार ता .७ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजीत केला आहे . कलशारोहण सोहळा श्री क्षेत्र ऋषीकेश उत्तरांचल अमृतसर पंजाब येथील श्री. श्री. १००८ श्री महंत स्वामी भुपेंद्र गिरिजी महाराज यांच्या शुभहस्ते व श्री कोरठण देवस्थानचे अध्यक्ष अॅड . पांडुरंग गायकवाड ,बालक आश्रम खंबाळाचे डॉ रत्नाकर पवार महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यानिमित्ताने दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन होणार आहे.

श्री रंगदास स्वामीच्या उत्सवाच्या निमित्ताने बुधवार ता. ७ ते गुरुवार ता.१५ फेब्रुवारीच्या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचेही आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह कालावधीत नामवंत किर्तनकार व प्रवचनकार यांच्या माध्यमातुन ज्ञानदान होणार आहे. काल्याचा महाप्रसाद कै .हिराबाई आरोटे यांच्या स्मरणार्थ संदिप आरोटे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे