Breaking News

शिवसेनेची दखल घ्यावीशी वाटत नाही : खडसे

‘शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही. त्यांनी आधी सत्तेतून बाहेर पडावे आणि मग भाजपच्या लोकांवर टीका करावी’, अशा शब्दात भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेनं ‘सामना’तून केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. ‘शिवसेनेची सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत नाही. त्यामुळे ते सत्तेत राहूनच भाजपवर टीका करत राहतील.’ असेही यावेळी खडसे म्हणाले. ‘एकनाथ खडसे यांना काँग्रेस- राष्ट्रवादीकडून खुली ऑफर आहे. मात्र पदर ढळल्यावर अशी ऑफर यायचीच. या जन्मातले कर्माचे फळ याच जन्मात फेडायचे असते’, अशी तिखट टीका शिवसेनेने ‘सामना’ या मुखपत्रातून केली होती.