Breaking News

खादी ग्रामोद्योगाच्या डायरीवर पुन्हा मोदी यांचा फोटो महात्मा गांधीचा फोटो यावर्षी देखील हटवल्यामुळे वादंग होण्याची चिन्हे

 मुंबई : यंदाच्या 2018 खादी ग्रामोद्योगाच्या डायरीवरून महात्मा गांधी यांचा फोटो पुन्हा गायब करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वादंग होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापल्यामुळे टीकेची झोड उठली होती. टीकेचे धनी झाल्यानंतर यंदाही भाजप सरकारनं ’पहिले पाढे पंचावन्न’चा कित्ता गिरवलाय.


डायरीच्या पहिल्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच फोटो छापण्यात आला. गेल्या वर्षी खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवरून सरकारनं महात्मा गांधींना गायब केलं होतं. यावर्षी डायरीवरून गांधींना गायब केले. 2018 ची खादी ग्रामोद्योग आयोगाची ही डायरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो पाहिल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. पण हे खरं आहे. महात्मा गांधींऐवजी खादी ग्रामोद्योग आयोगाच्या डायरीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी झळकत आहेत. खादी ग्रामोद्योगाची स्थापना 61 वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी केली होती. तेव्हापासून सुरू असलेला हा उद्योग तसाच सुरू आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या 2018 डायरीवरही महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आलाय.या मुद्यावरून राष्ट्रीय पातळीवर टीकेची झोड उठली होती. पण पुन्हा गांधींऐवजी मोदींचा फोटो बघून राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये. कुठल्याही राजकीय पक्षाने त्यात अशापध्दतीचा हस्तक्षेप केला नव्हता म्हणूनच हा फोटो बघून विरोधकांनी पुन्हा टीकास्त्र सोडलंय. भाजप नेत्यांनी मात्र याबाबत मौन बाळगलंय. पण भाजप सरकार हे स्वत: ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्यात अधिक तत्पर असल्याची टीका विरोधकांकडून नेहमीच होते. पण हा फोटो बघून याची सीमा गाठल्याचं समोर आलंय.