Breaking News

पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील 'मिनी मॅरेथॉन'मध्ये हजारो स्पर्धक


प्रवरानगर प्रतिनधी :- पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील 'मिनी मॅरेथॉन' मध्ये तब्बल २२ हजार बालगोपाळ, महिला-पुरुष आणि ज्येष्ठांसह दिव्यागांनी मोठ्या उत्साहात ‘दौड’ केली. स्पर्धा नव्हे, व्यायामाची सवय आणि प्रेरणा देणाऱ्या या 'मॅरेथॉन' मध्ये राज्यभरातील स्पर्धक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री अदिती सारंगधर आणि संयोजक प्रवरा अभिमत विद्यापीठाचे उप-कुलपती डॉ. राजेंद्र विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणी येथील अध्यापक महाविद्यालयाच्या प्रांगणातून पहाटे साडेसहा वाजता अनुक्रमे ३ कि. मी, ५ कि. मी. आणि १० कि. मी अशा विविध टप्प्यांच्या अंतरात या ‘दौड’ला प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिसरातील ज्येष्ठ क्रीडा संचालक प्रा. बाळासाहेब विखे, प्रा. अफजल पटेल, डॉ. सुनील बुलार, प्रा. उत्तमराव अनाप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच क्रीडा शिक्षकांनी पुढाकार घेतला. वाहतूक नियंत्रणासाठी लोणी पोलिसांचे उत्तम सहकार्य मिळाले.

प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वाय. एम. जयराज, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर, प्रा. विजय आहेर. प्रवरा पब्लिक स्कूलचे संचालक कर्नल सुरेंद्रकुमार सिंग, प्राचार्य डॉ. संपतराव वाळुंज, प्रा. दिगंबर खर्डे, डॉ. विद्या वाजे, प्राचार्या लीलावती सरोदे आदींच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला.